तुम्हाला मतदान कार्ड महाराष्ट्र 2025 अंतर्गत नवे मतदान ओळखपत्र हवे असेल, तर घरबसल्या मिळवा मतदान ओळखपत्र! ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया.

घरबसल्या मिळवा मतदान ओळखपत्र! 

आपल्याकडे कोणतेही सरकारी काम असेल तर अनेकदा सरकारी कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागते किंवा तासंतास अधिकाऱ्यांची वाट बघावी लागते. मात्र डिजिटल इंडिया मोहिमेमुळे हे चित्र बदलले आहे. आता अनेक सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे घरबसल्या सहजपणे काम पूर्ण करता येऊ शकते.

जर तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2025  अंतर्गत नवे मतदान ओळखपत्र हवे असेल, तर कोणत्याही कार्यालयात जाऊन उभे राहण्याची गरज नाही. फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने सोपी प्रक्रिया पूर्ण करून Voter ID card Download with Photo करता येणार आहे. चला, जाणून घेऊयात संपूर्ण प्रोसेस…

 

1️⃣ ‘Voter Helpline’ अ‍ॅप डाऊनलोड करा

 

  • सर्वप्रथम, Google Play Store किंवा Apple Store वर जाऊन Voter Helpline अ‍ॅप डाउनलोड करा.
  • त्यानंतर मतदार नोंदणी (Voter Registration) वर टॅप करा आणि पुढील इंटरफेसमध्ये नवीन मतदार नोंदणी पर्याय निवडा.
  • आता Form 6 भरावा लागेल. ‘लेट्स स्टार्ट’ वर क्लिक करून पुढे जा आणि होय, मी प्रथमच अर्ज करीत आहे हा पर्याय निवडा.

 

2️⃣ आवश्यक माहिती भरा

 

  • तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल, त्यात राज्य, जिल्हा, आणि विधानसभा मतदारसंघ निवडा.
  • जन्मतारीख प्रविष्ट करा आणि आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटोचा आकार 200 KB पेक्षा जास्त नसावा).
  • पुढील स्टेपमध्ये तुमचा फोटो अपलोड करा, त्यानंतर लिंग (Gender), नाव, मोबाईल नंबर, आणि ईमेल आयडी भरावा लागेल.

 

3️⃣ अंतिम टप्पा – पत्ता आणि कागदपत्रे

 

  • ‘तुमचे नाते’ या पर्यायात तुम्ही वडील/आई/पती यांचे नाव भरू शकता.
  • त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता, पोस्ट ऑफिस, आणि पिन कोड टाका.
  • शेवटी पत्ता प्रमाणपत्र (Address Proof) अपलोड करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.

 

📢 महत्वाची सूचना

ही संपूर्ण सेवा विनामूल्य आहे. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

🗂️ Voter ID Download आणि मतदार यादीत नाव शोधणे

 

  • तुमचे नवीन मतदान ओळखपत्र तयार झाल्यावर, तुम्ही Voter ID Download करू शकता.
  • मतदार यादीत नाव शोधणे यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा Voter Helpline अ‍ॅपचा वापर करा.

आता मतदान ओळखपत्र मिळवणे अधिक सोपे झाले आहे!

हे पण पहा – 

गुगल पे लोन स्कीम: Google Pay कडून 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा; संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Leave a Comment