संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आज संसदेत सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात Budget 2025 चे वाचन सुरू केले. यंदाच्या 2025 चे बजेट काय आहे? या प्रश्नावर सामान्य नागरिक, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि करसंबंधी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
2025 च्या बजेटमध्ये काय स्वस्त आहे?
• लिथियम-आयन बॅटरीवरील कर सवलत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) बॅटरी उत्पादनासाठी ३५ अतिरिक्त भांडवली वस्तूंना मूलभूत सीमाशुल्कातून सूट.
• मोबाईल फोन बॅटरी उत्पादनावर कर सूट: २८ वस्तूंवर सीमाशुल्क सवलत.
• गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील सीमाशुल्क: ३०% वरून ५% पर्यंत कमी.
• कर्करोग आणि दुर्मिळ आजारांसाठी औषधांवरील कर सवलत: ३६ जीवनरक्षक औषधांना पूर्ण सीमाशुल्क सूट.
नवीन कर स्लॅब काय आहे?
2025 मध्ये नवीन करस्लॅब लागू करण्यात आले आहेत.
What is the tax slab in 2025?
• ० ते ४ लाख: Nil (करमुक्त)
• ४ ते ८ लाख: ५%
• ८ ते १२ लाख: १०%
• १२ ते १६ लाख: १५%
• १६ ते २० लाख: २०%
• २० ते २४ लाख: २५%
• २४ लाखांपेक्षा अधिक: ३०%
यंदाच्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे.
What about standard deduction in budget 2025?
• टीडीएसची (TDS) मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून १५ लाख करण्यात आली.
• ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजावरील कर सवलत: ५०,००० वरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवली.
• वार्षिक उत्पन्न मर्यादा: २.४ लाखांवरून ६ लाख रुपये करण्यात आली, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी घोषणा
• IIT क्षमतावाढ प्रकल्प: ५ IIT संस्थांमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा विकसित होणार.
• आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साठी ३ केंद्र स्थापन होणार.
• वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७५०० नवीन प्रवेश क्षमता वाढवली जाणार.
• भारतीय भाषा पुस्तक योजना: डिजिटल स्वरुपात स्थानिक भाषांमध्ये शालेय आणि उच्च शिक्षणाची पुस्तके उपलब्ध होणार.
उडान योजना
• देशभरातील १२० नवीन ठिकाणी हवाई वाहतूक सुविधा मिळणार.
• ४ कोटी नवीन हवाई प्रवासी वाढण्याचा अंदाज.
• हेलीपॅड आणि डोंगराळ भागात नवीन विमानतळ उभारण्यास प्राधान्य.
एमएसएमई (MSME) आणि उद्योग क्षेत्रातील सुधारणा
• सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी ५ कोटींवरून १० कोटींवर.
• डिजिटल MSME प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन.
• स्टार्टअपसाठी १० ते २० कोटी रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा.
शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठा फायदा
• पंतप्रधान धनधान्य कृषी योजना: १०० जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार.
• डाळींच्या उत्पादनासाठी ६ वर्षांचा विशेष कार्यक्रम.
• केंद्र सरकार पुढील ३ वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करणार.
• फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार.
पर्यटन क्षेत्रात मोठे बदल
• देशातील ५२ प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास.
• पर्यटन विमा योजनेला प्रोत्साहन.
• व्हिसा नियम अधिक सोपे करण्याची घोषणा.
गिग इकॉनॉमीतील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना
• ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनांचे फायदे मिळणार.
• १ लाख ऑनलाईन कामगारांना या योजनेचा लाभ.
2025 चे बजेट काय आहे?
यंदाचा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणारा, सर्वसमावेशक विकास आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. कृषी, लघू-मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही अर्थव्यवस्थेची चार प्रमुख इंजिन्स ठरणार आहेत.
👉 तुमच्या क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल? तुमच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागेल? अधिक माहितीसाठी संपूर्ण अर्थसंकल्पाचे अपडेट वाचा! 🚀
हे पण पहा –
घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर, 20 लाख कुटुंबांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ पहा सविस्तर माहिती.