Hmpv Prevention Tips: ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची प्रकरणे अर्थात HMPV भारतातही समोर येऊ लागली आहेत. ICMR ला कर्नाटकातील बंगळुरू येथे नियमित चाचणी दरम्यान HMPV ची दोन प्रकरणे आढळली आहेत.
दोन्ही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये संसर्ग आढळून आला आहे – तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा. मात्र, उपचारानंतर तीन महिन्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात HMPV संसर्गामध्ये वाढ होत असल्याने सरकारने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे सरकारने म्हटले आहे. HMPV केस भारतात आहे का? होय, भारतात याचे प्रकरणे समोर येत आहेत, पण काळजी करण्याचे कारण नाही.
Human Meta Pneumo Virus म्हणजे काय?
सायन्स डायरेक्टनुसार, या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांकडून झाली. 2001 मध्ये मानवांमध्ये याचा शोध लागला. HMPV विषाणू Pneumoviridae कुटुंबाशी संबंधित आहे, जे रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (RSV) सारखे आहे.
हे पण वाचा – पोटावर वाढलेली चरबी व वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर?
HMPV गंभीर आहे का?
भारतीय आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, HMPV एक सामान्य विषाणू आहे. त्यामुळे सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार होऊ शकतात. हे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसते. मात्र, हा विषाणू गंभीर आजार घडवत नाही.
एचएमपीव्ही लक्षणे
तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या:
- खोकला
- नाक बंद होणे
- ताप
- घसा खवखवणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- संसर्ग वाढल्यास ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो.
How long does HMPV cough last?
एचएमपीव्हीचा इन्क्यूबेशन काळ साधारणत: तीन ते सहा दिवसांचा असतो. लक्षणे अधिक दिवस टिकल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
HMPV चा प्रसार कसा होतो?
- खोकताना किंवा शिंकताना थुंकीच्या कणांद्वारे
- हस्तांदोलन, मिठी मारणे किंवा स्पर्श केल्याने
- संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श करून चेहऱ्याला हात लावल्यास
हे पण वाचा – डोक्यावर पुन्हा केस उगवण्यासाठी नॅचरल उपाय ट्राय करा, टोपी घालून फिरणं बंद होईल!
HMPV टिप्स
- सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा.
- खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल किंवा मास्कने झाका.
- आपले हात वारंवार धुवा.
- सर्दी, खोकला असल्यास मास्क लावा आणि घरी आराम करा.
- भांडी शेअर करू नका.
What is the treatment for HMPV?
सध्या HMPV वर कोणतेही विशेष अँटीव्हायरल औषध किंवा लस उपलब्ध नाही. सामान्य सर्दी, ताप यासाठीच औषधोपचार केला जातो.
HMPV परत येऊ शकतो का?
होय, अन्य विषाणूसारखा HMPV देखील पुन्हा येऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या आणि योग्य स्वच्छता पाळा.