शेतात जायला रस्ता नाही, कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता कसा मिळवायचा? पहा सविस्तर माहिती .
‘शेती’ म्हटली की, छोटे-मोठे वाद आलेच. त्यातील बहुतांश वाद हे shet rasta वरून होताना दिसतात. एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला samanarthi shabd rasta देण्यास नकार दिल्यास याचा तोटा संबंधित शेतकऱ्याला होतो.
शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळी shet rasta kayda काय सांगतो आणि कायदेशीर पद्धतीने shet rasta yojana अंतर्गत रस्ता कसा मिळवायचा हे आपण जाणून घेणार आहोत.
Shet rasta kayda काय सांगतो?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार, संबंधित शेतकरी shet rasta niyam अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज दाखल करू शकतो.
अर्ज कसा करावा?
कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात लेखी अर्ज करावा लागतो. या अर्जामध्ये:
- कारणाची स्पष्टता द्यावी.
- अर्जाचा विषय नमूद करावा.
- अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, शेतीचा तपशील, आणि शेजारील शेतकऱ्यांची नावे व पत्ते नमूद करावेत.
हे पण वाचा – PM kisan samman nidhi yojana पीएम किसान योजना 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार जमा.
आवश्यक कागदपत्रे
- मागणी केलेल्या जमिनीचा नकाशा अर्जासोबत जोडणे.
- अर्जदाराचा सातबारा उतारा, शेजाऱ्यांची माहिती, आणि शेतीचा तपशील नमूद करणे गरजेचे आहे.
- जमिनीवर वाद असल्यास, त्याची कायदेशीर प्रत अर्जाला जोडणे बंधनकारक आहे.
तपासणी प्रक्रिया
अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार संबंधित अर्जाची तपासणी करतात. शेजारच्या शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून, अर्जदाराला खरंच shet rasta आवश्यक आहे का, हे तपासले जाते. पाहणी पूर्ण झाल्यावर तहसीलदार rasta rules आणि shet rasta gr नुसार निर्णय घेतात.
निष्कर्ष
shet rasta yojana च्या नियमानुसार, शेतकऱ्याला कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता मिळवण्याची प्रक्रिया स्पष्ट आहे. योग्य कागदपत्रे आणि कारणांसह अर्ज केल्यास संबंधित प्राधिकरणाकडून निर्णय घेतला जातो.