मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने bombay high court recruitment 2025 अंतर्गत शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २४ शिपाई पदे रिक्त असून, येत्या दोन वर्षांत आणखी १२ पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने एकूण ३६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, bombay high court recruitment peon साठी १६,००० रुपये ते ५२,००० रुपये वेतनमान निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार 18 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत अर्ज करू शकतात.
आवश्यक पात्रता आणि परीक्षा प्रक्रिया
शिपाई पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा, तसेच त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवार निर्व्यसनी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. अर्जदारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची 30 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये किमान 15 गुण मिळवणे आवश्यक असेल. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. यानंतर उमेदवारांची 10 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे.
अर्ज कसा कराल?
उमेदवारांना bombay high court recruitment 2025 apply online प्रक्रिया अंतर्गत अर्ज करावा लागेल. अर्ज केवळ bombay high court recruitment 2025 official website वरच स्वीकारले जातील. अर्ज प्रक्रिया 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि 4 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहील. अर्ज भरताना उमेदवाराला ५० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत उमेदवाराने खालील कागदपत्रे सादर करावी लागतील
- जन्मतारखेचा पुरावा
- सातवी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असल्यास गुणपत्रिका
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी (अपलोड करणे आवश्यक)
हे पण पहा –

bombay high court recruitment 2025 last date लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती bombay high court recruitment 2025 official website वर वेळोवेळी प्रकाशित केली जाणार आहे. तसेच, परीक्षेसाठी आवश्यक माहिती व अभ्यासक्रम high court recruitment 2025 syllabus वर उपलब्ध असेल.
हे पण पहा –