विमा सखी योजना ‘या’ स्कीममधून महिलांना दरमहा मिळतील 7 हजार रुपये! अशा प्रकारे करा अर्ज.

विमा सखी योजना

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने एलआयसी बिमा योजना सुरू केली आहे. विमा सखी योजना काय आहे? यामध्ये दहावी उत्तीर्ण महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे त्या दरमहा 7,000 रुपये पर्यंत कमाई करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला 18 ते 70 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

विमा सखी योजना काय आहे?

एलआयसी बिमा योजना अंतर्गत, महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. सरकारने 3 वर्षांत देशभरातून 2 लाख बिमा सखी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना Stipend दिले जाते आणि त्यानंतर त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. भविष्यात, पात्र महिलांना विकास अधिकारी होण्याची संधीही मिळू शकते.

विमा सखी योजनेसाठी कोण पात्र आहे?
  • अर्जदार महिला दहावी उत्तीर्ण असावी.
  • वयोमर्यादा 18 ते 70 वर्षे असावी.
  • या योजनेत केवळ महिला अर्ज करू शकतात.
प्रशिक्षणादरम्यान मिळणारे आर्थिक लाभ
  • प्रथम वर्ष: दरमहा 7,000 रुपये
  • द्वितीय वर्ष: दरमहा 6,000 रुपये
  • तृतीय वर्ष: दरमहा 5,000 रुपये
  • 3 वर्षांत 2 लाखांहून अधिक कमाई
  • याशिवाय, एजंट म्हणून काम केल्यानंतर कमिशनद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल.
अर्ज प्रक्रिया – एलआयसी बिमा योजना
  1. एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला https://licindia.in/test2 भेट द्या.
  2. खाली स्क्रोल करा आणि “Click here for Bima Sakhi” या लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा – नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी.
  4. जर तुम्ही एलआयसीच्या कोणत्याही एजंट, कर्मचारी किंवा वैद्यकीय परीक्षकाशी संबंधित असाल, तर तपशील द्या.
  5. कॅप्चा कोड भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

ही योजना महिलांसाठी मोठी संधी आहे, ज्यायोगे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. विमा सखी योजना काय आहे? हे समजून घेऊन इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा!

हे पण पहा –

आता ग्राहकांना HDFC बँक 38 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज देणार आहे ! जर ग्राहकांनी 25 वर्षासाठी 38 लाखाचे कर्ज घेतले तर त्यांना कितीचा हप्ता भरावा लागणार ? पहा सविस्तर माहिती.

Leave a Comment