आता ग्राहकांना HDFC बँक 38 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज देणार आहे !
HDFC Bank Home Loan : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून ग्राहकांना होम लोन देखील उपलब्ध करून दिले जात आहे.
जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण एचडीएफसी बँकेच्या होम लोन ची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे उपाय केल्यास टक्कल पडलेल्या डोक्यावर केस वाढवता येतात. टोपी घालून फिरणं बंद होईल! Natural Remedies For Baldness
एचडीएफसी बँकेचे होम लोनसाठीचे व्याजदर
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 8.75 टक्क्यांपासून ते 9.95% व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहे.
मात्र कर्जाची रक्कम आणि व्याजदर हे सिबिल स्कोर व्यतिरिक्त जॉब प्रोफाइल आणि सॅलरीवर पण अवलंबून असते. तुम्ही या सर्व क्रायटेरियामध्ये फिट बसलात तर तुम्हाला कमी व्याजदरात गृह कर्ज मंजूर होऊ शकते.
मद्यपान असो किंवा धूम्रपान, दोन्ही गोष्टींची सवय आपल्याला मृत्यूच्या दारी खेचत असते. धूम्रपान केल्याने काय होते?
एचडीएफसी बँकेकडून 38 लाखांचे गृह कर्ज मंजूर झाले तर
प्रायव्हेट सेक्टर मधील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने जर एखाद्या ग्राहकाला 38 लाख रुपयांचे गृह कर्ज 25 वर्ष कालावधीसाठी मंजूर केले तर त्याला 31,241 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच 93 लाख 72 हजार 300 रुपये बँकेत भरावे लागणार आहेत. अर्थातच 55 लाख 72 हजार 300 रुपये निव्वळ व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.
38 लाखांचे गृहकर्ज मिळवण्यासाठी किती पगार असायला हवा?
एचडीएफसी बँकेकडून जर तुम्हाला 38 लाख रुपयांचे गृह कर्ज हवे असेल तर तुमचा किमान पगार हा 62 हजार 482 प्रति महिना एवढा असायला हवा.
याशिवाय आधीच डोक्यावर कर्जाचे ओझंही नकोय. जर तुमच्यावर आधीच एखादे कर्ज असेल तर तुम्हाला कमी कर्ज मंजूर होईल.
Relve Bharti 2025: सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी.