Vima Sakhi Scheme केंद्र सरकारची विमा सखी योजना लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणार 7000 हजार रुपये? विमा सखी योजना आली..फायदाच फायदा! पहा सविस्तर माहिती.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ राज्यातील महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाली. या योजनेचा थेट आर्थिक लाभ महिलांना मिळाला. या योजनेच्या जोरावर भाजपच्या महाआघाडी सरकारने दणदणीत विजय मिळवला.
ही योजना या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आहे.
महायुती सरकारच्या या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीपूर्वी महायुतीने ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली आहे.केंद्र सरकारने महिलांसाठीआधीच खूशखबर देत मोठी योजना आणली आहे.
विमा सखी योजना आली..फायदाच फायदा
केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव आहे विमा सखी योजना. आता यातूनही महिलांना रोजगार मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे. आता ही योजना नेमकी काय आहे, त्यात कोणते फायदे मिळतील आणि त्यासाठीची पात्रता काय असेल?, जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
ही योजना LI द्वारे राबविण्यात येणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, म्हणजेच ९ डिसेंबर रोजी हरियाणा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी ही विमा सखी योजना सुरू केली आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC या भारत सरकारच्या मालकीची विमा कंपनी राबवत आहे.
काय आहे या योजनेत? आणि पात्रता देखील
- या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- योजनेसाठी महिलांनी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- महिलेचे किमान वय १८ वर्षे असावे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- या काळात महिलांना स्टायपेंडही मिळेल.
- तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात.
- पदवी पूर्ण केलेल्या विमा मित्रांनाही LIC मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल.
- महिलांना हे मानधन देण्यात येणार आहे
- या योजनेंतर्गत महिलांना दरमहा ७ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
- दुसऱ्या वर्षी ही रक्कम वाढवून 6 हजार करण्यात येणार आहे.
- तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5000 रुपये असेल.
- महिलांनी त्यांचे टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिले जाईल.
- या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३५ हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाणार आहे.
- पुढील टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.