थंडी गेली, आज पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार! अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबरावांनी सांगितला हवामान अंदाज

Panjabrao Dakh News महाराष्ट्रात आज पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. 

 21 डिसेंबरपासून राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे.

21, 22 आणि 23 डिसेंबरपर्यंत विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

या तीन दिवस राज्यात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगड, नागपूर येथे पाऊस पडेल.

विदर्भ आणि नागपूरमध्ये 24 तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. 

२४ तारखेला हवामानात किंचित बदल होणार असून त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.  पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस पडेल.

25 तारखेपासून मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.  पंजाबराव यांनी मराठवाडा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, परभणी, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जतमध्ये 25 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे.

26 ते 27 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडेल.  

21 ते 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.  म्हणजेच या काळात राज्यभर पाऊस पडणार नसून विविध भागांत पाऊस पडेल.

हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.  दुसरीकडे, पुणे वेधशाळेनेही महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पुणे वेध शाळेचा अंदाज 

पुणे वेधशाळेनुसार, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथा परिसर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 20 डिसेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पिकांची विशेषत: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

Leave a Comment