Solar Pump Yadi: PM-KUSUM ही योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान मार्फत राबवली आहे.या योजनेतून शेतकऱ्यांना सौरपंप दिले जातात.
या योजनेच्या 2024 च्या सौर पंप लाभार्थ्यांची यादी सरकारी वेबसाइटवर (PM Kusum वेबसाइट) उपलब्ध आहे. ही यादी शेतकरी त्यांच्या मोबाईलवरही पाहू शकतात.
चला तर मग जाणून घेऊया सोलर पंप लिस्ट पाहण्याची प्रक्रिया…
सर्वप्रथम केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या पंतप्रधान कुसुमच्या खालील पोर्टलला भेट द्या.
https://pmkusum.mnre.gov.in/
यानंतर PM Kusum New and Renewable Energy Ministry पोर्टल उघडले जाईल.
मुख्यपृष्ठाच्या शेवटी सार्वजनिक माहितीमध्ये योजना लाभार्थी यादीवर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. ते तुमचे राज्य, जिल्हा, पंप क्षमता आणि स्थापनेचे वर्ष यासारखे पर्याय दर्शवेल.
या पर्यायानुसार तुमचे राज्य (यात महाराष्ट्र – मेडा आणि महाराष्ट्र – एमएसईडीसीएल असे दोन पर्याय दिसतील), तुम्ही ज्या पर्यायातून अर्ज केला आहे तो पर्याय निवडा.
यानंतर जिल्हा, पंप बसवण्याचे वर्ष (3 HP, 5 HP) निवडावे लागेल.आणि Go वर क्लिक करा.
एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांचे नाव, जिल्हा, गाव, सोलर कंपनी स्क्रीनवर दिसेल.तुम्ही ही यादी PDF स्वरूपातही डाउनलोड करू शकता.