शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस व सोयाबीन ला मिळाला उचांकी हमीभाव -Cotton Soyabean Guaranteed Price

कापूस सोयाबीनचा भाव : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने 2024-25 साठी सोयाबीन आणि कापसाचे हमी भाव जाहीर केले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी आवश्यक केंद्रांची संख्या वाढविण्याबाबतही चर्चा केली. केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी सकारात्मकता दाखवली आहे.

 

 

 कापसाचा हमी भाव

  •  मध्यम धागा कापूस : 7 हजार 121 रुपये प्रति क्विंटल
  •   लांब धागा कापूस : 7 हजार 521 रुपये प्रति क्विंटल
  •   501 प्रति क्विंटल, मागील वर्षीच्या तुलनेत वाढ
  •   कापूस उत्पादन आणि खरेदी व्यवस्था
  •   राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्रः ४०.७३ लाख हेक्टर
  •   अंदाजे एकूण उत्पादन: ४२७.६७ लाख क्विंटल (४२.७७ लाख मेट्रिक टन)
  •   भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत खरेदी.

  

 

121 मंजूर खरेदी केंद्रे

  •   अतिरिक्त 30 खरेदी केंद्रांची प्रस्तावित मागणी
  •   16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 71 केंद्रांवर 55,000 क्विंटल (11,000 गाठी) कापूस खरेदी
  •   सध्याचा बाजारभाव सरासरी 7,500 रुपये प्रति क्विंटल आहे
  •  ( सामान्य ‘गॅस’ वर, सीएनजीच्या किमती 6-8 रुपयांनी वाढण्याची शक्यता)

  

 

सोयाबीनचा हमी भाव

  •   नवीन हमी भाव : 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल
  •   सोयाबीन उत्पादन आणि खरेदी व्यवस्था
  •   लागवडीखालील क्षेत्रः 50.51 लाख हेक्टर
  •   एकूण उत्पादन: 73.27 लाख मेट्रिक टन
  •   PSS अंतर्गत केंद्रीय मंजूरी: 13.08 लाख मेट्रिक टन

 

 

राज्य सरकारचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट: 10 लाख मेट्रिक टन.

  •   26 जिल्ह्यांमध्ये 532 खरेदी केंद्रे मंजूर.
  •   494 खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.
  • 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2 लाख 2 हजार 220 शेतकऱ्यांची नोंदणी.
  • एकूण खरेदी: 13 हजार मेट्रिक टन
हे पण पहा येथे क्लिक करा –
सोलर पंप
सोलर पंप

 

 

महायुतीच्या जाहीरनाम्यात भावांतर योजनेचा समावेश, जाहीर सभेतून फडणवीसांचे शेतकऱ्यांना आश्वासन

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना.

  1. दोन्ही पिकांच्या खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना.
  2. खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना.
  3. शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश.
  4.   खरेदी केंद्रांवर आवश्यक सुविधा देण्याच्या सूचना.

 

 

 अधिकृत खरेदी संस्था

  कापूस खरेदीसाठी

  भारतीय कॉटन कॉर्पोरेशन (CCI)

  सोयाबीन खरेदी करण्यासाठी

  नाफेड

  NCCF (NCCF)

  •   महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई
  •   विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, नागपूर
  •   पृथा शक्ती शेतकरी उत्पादक कंपनी
  •   महाकिसान संघ शेतकरी उत्पादक कंपनी
  •   पृथा शक्ती शेतकरी उत्पादक कंपनी
  •   महाकिसान संघ शेतकरी उत्पादक कंपनी
  •   महाकिसान वृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनी

 

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य मोबदला मिळणार आहे. यंदाच्या कृषी वर्षात दोन्ही पिकांसाठी वाढलेला हमी भाव ही शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट ठरली आहे.

Leave a Comment