Namo shetkari yojana 1st installment Date:नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तारीख: नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी जारी केला जाईल याची माहिती पाहणार आहोत. यासोबतच खात्यावर हप्ता कधी आणि कोणत्या तारखेला पडणार हे देखील कळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तारीख
मित्रांनो, 27 जुलै रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा 14 वा हप्ता जाहीर केला. बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेजही शेतकऱ्याच्या मोबाईलवर आला होता. परंतु पीएम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नवीन योजना, नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासोबत द्यायचा होता. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही, त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असलेले ४ हजार रुपये मिळालेले नाहीत.

नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी 

इथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे 2000 रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण आता एक नवीन अपडेट आहे. यासोबतच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी पडणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार
जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना आता 14 वा हप्ता मिळाला आहे, त्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळेल.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता किती आहे
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्याप्रमाणे 2000 असणार आहे. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत 2000 आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 असे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत.

मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या तारखेबद्दल काही प्रश्न असल्यास, कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.