राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट उसळली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांत कडाक्याची थंडी सुरू झाली असून, आता सर्वत्र शेकोटी पेटवली जात आहे.
राज्यात थंडीची तीव्रता वाढली
राज्याच्या काही भागात दिवसा आणि रात्रीच्या कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, परिणामी थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांनाही याचा फायदा होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
मात्र, दरम्यान पंजाबरावांनी नवा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे. पंजाबराव यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार पुढील आठ दिवस म्हणजे २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील.
नवीन चक्रीवादळाचा इशारा
मात्र, 29 तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरपासून राज्यातील काही भागात पुन्हा पाऊस सुरू होईल, असा अंदाज डखने वर्तवला आहे.
पंजाब राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये 29 आणि 30 तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस पुढे आंध्र प्रदेशात जाईल आणि आंध्र प्रदेशातून हा पाऊस आपल्या महाराष्ट्रात येईल.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असून 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण पहा –
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
पंजाब राव सांगतात की, दरवर्षी महाराष्ट्रात 2 ते 7 डिसेंबर दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडतो. या वर्षीही अशीच परिस्थिती दिसून येईल आणि 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे पंजाब राव यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. खरं तर आता कुठेतरी थंडी सुरू झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची तीव्रता कमी असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच होत होती. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना थंडीची नितांत गरज आहे.
मात्र यंदा थंडीचा हंगाम उशिरा सुरू झाला आणि 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र 18 नोव्हेंबरपासून राज्यात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. मात्र, १ डिसेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.